Sunday, 22 September 2013

लोणार सरोवर प्रदक्षिणा : एक अविस्मरणीय अनुभव

माझ्या आजवरच्या आयुष्यात खरंतर मी खुप प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. पण लोणार सरोवर मात्र नेहमीच एक विशेष अनुभव राहिला. शासन आणि स्थानिक लोकप्रतिनीधीँच्या उदासीनतेमुळे विनाशाकडे झुकलेला ५० हजार वर्षापूर्वीचा हा जागतिक आश्चर्याचा ठेवा उपेक्षा सोसूनही आजही विश्वाला खुणावतो आहे. लोणार सरोवर आमच्या मेहकर या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे खुप खुप तर २०-२५ किमी! तसं तर लोणारला मी नेहमीच जातो आणि लहानपणी दरवर्षी आईसोबत नवरात्रीमध्ये लोणार सरोवराच्या मध्यभागी वसलेल्या कमळजा देवीच्या दर्शनला सुद्धा आवर्जून जायचो पण एक गोष्ट मला नेहमीच खुनवायची ती म्हणजे लोणार सरोवराची प्रदक्षिणा! लोणार सरोवराची प्रदक्षिणा हा एक सुखद अनुभव आहे. खास करून अशा निसर्गप्रेमींसाठी ज्यांना ट्रेक वगैरे ची विशेष आवड आहे. लोणार सरोवराला प्रदक्षिणा मारताना काही वर्षांपूर्वी हा जागतिक आश्यार्याचा  ठेवा किती सुंदर असेल या कल्पनेनेच मन अगदी प्रसन्न होते. परंतु मी वर नमूद केल्याप्रमाणे फक्त आणि फक्त शासनाच्या उदासीनतेमुळे आज हा जागतिक वारसा विनाशाकडे झुकला आहे. बरयाच पर्यटकांसाठी लोणारला भेट हि फक्त तेधील धार बघण्यापूर्वी मर्यादित आहे. लोणार सरोवराच्या डाव्या बाजूने कमळजा देवी मंदिरापर्यंत चांगली पायवाट आहे. कमळजा देवी मंदिर म्हणजे लोणार सरोवर प्रदक्षिणेचा मध्यबिंदू! नवरात्रीच्या काळात भक्तांची ये जा याच रस्त्याने होते. परंतु  सरोवराच्या उजव्या बाजूने रस्ता थोडा निर्मनुष्य होतो. अवैध वृक्षतोड वगैरे प्रकार बघायला मिळू शकतात. म्हणून या बाजूने थोडी सावधगिरी बाळगायला हवी. 
Lonar Sarovar
Add caption

Wednesday, 31 July 2013

मराठी वृत्त वाहिन्यांची जीवघेणी स्पर्धा

काही वर्षांपूर्वी कोणी विचार पण केला नसेल आज एवढ्या वृत्तवाहिन्या सध्या मराठी भाषेत येवू घातल्या आहेत. पण स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणवनाऱ्याया या मराठी वृत्त वाहिन्यांना आज 'आदर्श' पत्रकारितेचा मात्र साफ विसर पडत चाललाय. तरीपण हिंदी वृत्त वहिन्यांच्या तुलनेत त्यांचा दर्जा कितीतरी सरस आहेत यात मात्र मुळीच शंका नाही.